डॉलर च्या तुलनेत रुपयाची घसरण का होत आहे ? काय आहेत नेमकी कारण ?
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगाने सुरू आहे, डॉलरच्या तुलनेत घसरण नीचांकी पातळीवर गेली असून अनेक क्षेत्रांवर त्याचे दूरगामी परिणाम होऊ लागले आहेत. रुपयाची ही घसरण का होत आहे ? त्याची कारणे काय आहेत ? ती रोखण्यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम डॉलर Universal currency कसा बनला हे बघू . 1792 साली डॉलर ची निर्मिती झाली आणि त्याला value मिळावी म्हणून डॉलर ला सोन्यासोबत जोडण्यात आले जेणेकरून डॉलर चा जगभरात प्रसार व्हावा . जागतिक महायुद्धात अमेरिका इतर देशांना हत्यार पुरवठा करू लागली आणि त्याबदल्यात सोने घेऊ लागली ( त्याकाळी कोणतेही आंतरराष्ट्रीय चलन उपलब्ध नव्हते) म्हणजे आता डॉलर ला सोन्याच्या बरोबरीने किंमत मिळू लागली कारण तेव्हा डॉलर अमेरिका चे चलन होते. परंतु नंतर इतर देशांचा सोन्याचा साठा जसा कमी होऊ लागला तेव्हा देश चिंतेत पडले की आता व्यवहार (अमेरिका सोबत देवाण घेवाण ) कशी करायची . तेव्हा 1944 च्या जागतिक परिषदेत अमेरिकेणे त्यांचे डॉलर हे चलन इतर देशांना देण्याचे ठरवले व $ 35 = 1 ounce gold ( तीन तो...