अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगाने सुरू आहे, डॉलरच्या तुलनेत घसरण नीचांकी पातळीवर गेली असून अनेक क्षेत्रांवर त्याचे दूरगामी परिणाम होऊ लागले आहेत. रुपयाची ही घसरण का होत आहे ? त्याची कारणे काय आहेत ? ती रोखण्यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करू.
सर्वप्रथम डॉलर Universal currency कसा बनला हे बघू .
1792 साली डॉलर ची निर्मिती झाली आणि त्याला value मिळावी म्हणून डॉलर ला सोन्यासोबत जोडण्यात आले जेणेकरून डॉलर चा जगभरात प्रसार व्हावा .
जागतिक महायुद्धात अमेरिका इतर देशांना हत्यार पुरवठा करू लागली आणि त्याबदल्यात सोने घेऊ लागली ( त्याकाळी कोणतेही आंतरराष्ट्रीय चलन उपलब्ध नव्हते) म्हणजे आता डॉलर ला सोन्याच्या बरोबरीने किंमत मिळू लागली कारण तेव्हा डॉलर अमेरिका चे चलन होते. परंतु नंतर इतर देशांचा सोन्याचा साठा जसा कमी होऊ लागला तेव्हा देश चिंतेत पडले की आता व्यवहार (अमेरिका सोबत देवाण घेवाण ) कशी करायची . तेव्हा 1944 च्या जागतिक परिषदेत अमेरिकेणे त्यांचे डॉलर हे चलन इतर देशांना देण्याचे ठरवले व $ 35 = 1 ounce gold ( तीन तोळे) असा अनुपात ठरवण्यात आला.
आता डॉलर सोन्याच्या भावात विकू लागल्याने जगातील इतर देश डॉलर reserve करून ठेऊ लागले काही दिवसात त्याचे प्रमाण विविध देशात एकूण डॉलर पैकी 60 टक्के डॉलर चा साठा करण्यात येऊन अर्थव्यवस्थेत सोन्याची डिमांड कमी झाली होती.
नंतर च्या काळात जेव्हा अमेरिका - व्हिएतनाम युद्ध झाले आणि अमेरिकेला शस्त्र कमी पडू लागली त्याचा पुरवठा करण्यासाठी पैशाची गरज वाढली व त्याबदल्यात डॉलर ची कमी भासू लागली. आणि त्यावर उपाय म्हणून अमेरिका ने डॉलर ची प्रचंड प्रमाणात छपाई चालू केली. प्रचंड छपाई केल्यामुळे डिमांड पेक्षा supply वाढल्याने डॉलर ची value कमी होऊ लागली आणि तिथेच अमेरिकेची खेळी पलटली.
अमेरिकेणे जे डॉलर च्या बदल्यात सोने जमा केले होते आणि इतर देशांना सोन्याच्या बदल्यात डॉलर दिले होते , ते देश आता डॉलर चा भाव कमी झाल्याने त्यांच्याकडे पडून असलेला डॉलर वापस देऊन त्यांचे अमेरिका ला दिलेले सोने परत घेऊ लागली आणि त्यामुळे अमेरिका ची अर्थव्यवस्था कोलमडू लागली.
परंतु 1971 साली राष्ट्रपती Rechard Nixon यांनी मोठा Decision घेतला आणि डॉलर व सोन्यामधील जे relation होते ते संपवून टाकले. परंतु झाले असे की मोठ्या प्रमाणावर डॉलर चा साठा इतर देशांकडे पडून होता आणि तो वापरणे क्रमप्राप्त होते. आणि त्यावेळी अमेरिका जगातील सर्वात मोठा सप्लायर होता म्हणूनच डॉलर एक universal currency बनला.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोणत्याही currency ला underline asset नसत ( same as cryptocurrency) परंतु crypto आणि सरकारी चलनात हा फरक असतो की सरकारी चलन हे त्या देशाच्या government ने ठरवलेलं असत म्हणून त्याला value असते आणि cryptocurrency ही कोणीही बनवू शकत आणि कोणीही विकू शकते.
डॉलर / रुपया यांचं valuation कस होत ?
आपण नेहमी ऐकत असतो की रुपया घसरला, डॉलर महाग झाला तर हे नेमकं कस घडत?
कोणत्याही देशाच्या चलनाच valuation हे त्या देशाच्या GDP वरून ठरलं जात . GDP म्हणजे च त्या देशाचा एकूण import - export आणि GOLD Reserve . किती मागणी आहे ,किती import करताय किती export करताय . बऱ्याच वस्तू आपण आयात करतो आणि शेकडो वस्तू आपण निर्यात सुद्धा करतो. आणि हा सर्व व्यवहार डॉलर मध्ये केला जातो. जेव्हा import जास्त होतो आणि export कमी होतो तेव्हा आपल्याकडील डॉलर जास्त खर्च होतात आणि export च्या बदल्यात कमी डॉलर मिळतो तेव्हा आपल्या रुपयाचं मूल्यांकन कमी किंवा जास्त होत ही simple concept आहे.
रुपया घसरतो तरी का ?
1917 साली रुपयाची स्थापना झाली आणि 1947 साली एक रुपया equal to एक डॉलर होता. तेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता त्यामुळे त्याचे valuation पौंड सोबत compare केल्या जायचे तेव्हा 13 रुपये म्हणजे 1 pound होता. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा देश चालवण्यासाठी कर्ज घेण्याची वेळ आली. कारण आपल्याकडे उद्योग धंदे नाही त्यात लोकसंख्या प्रचंड आणि त्यात 1962 मध्ये भारत - चीन युद्ध झाले आणि त्यात भारताचे प्रचंड नुकसान झाले.
लगेचच 1965 मध्ये भारत - पाक युद्ध झाले यातही देशाचे अतोनात नुकसान झाले. 1966 मध्ये दुष्काळ आला आणि हे सर्व सावरण्यासाठी भारताला प्रचंड प्रमाणात कर्ज घ्यावे लागले आणि या सर्व कारणांमुळे 1967 साली डॉलर ची किंमत झाली 7.50 भारतीय रुपये. 1973 मध्ये जाणीवपूर्वक OPEC ने तेलाचे उत्पादन कमी केले ज्यामुळे डिमांड वाढून तेलाच्या किमती वाढवण्यात आल्या. त्याचा ही भारताला खूप मोठा फटका बसला कारण भारत मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करतो. आणि 1990 मध्ये डॉलर पुन्हा वधारला व 17.50 भारतीय रुपयांवर जाऊन पोहचला.
पुढे जाऊन भारतावरील कर्जाचा बोजा वाढत होता, आणि एकूण अर्थव्यवस्थेतील 39 टक्के वाटा निव्वळ व्याजाच्या स्वरूपात भरावा लागत होता. अर्थव्यवस्था कोलमडणार, देशाची currency संपनार , रुपया complete नेस्तनाबूत होणार इथपर्यंत परिस्थिती गेली होती.
1991 ला Liberalisation झालं वेगवेगळे उद्योगधंदे भारतात येऊ लागले भारताची GDP strong होणार पण भारत export कमी करत होता आणि import च जास्त करत होता त्यामुळे अर्थव्यवस्था as compare to डॉलर कमी च होती , आणि डॉलर वाढत च होता रुपयाची घसरण अखंड चालू होती , जी की अजूनही चालू च आहे . आणि all time low 78. 26 लगावला आहे.
अमेरिका ने आर्थिक मंदिवर मात करण्यासाठी मागील 2 वर्षात 5 trillion doller छापले . भारताचे 5 ट्रेलिअन ची economy होण्याचे जे स्वप्न आहे ते अमेरिकीने 2 वर्षात निव्वळ डॉलर छापून करून दाखवले. आणि त्याच पैशाने USA ला महागाई च्या खाईत ढकलले आहे. परंतु त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत कारण की डॉलर संपूर्ण जगातील देशांच्या चलनाशी connected आहे.
रुपयाच्या मूल्य घसरणीचे फायदे आणि तोटे काय ?
फायदे
- निर्यातीला चालना
निर्यात करणाऱ्या कंपन्यांना Ex - IT , pharma, textile, वाहने आणि वाहनांचे parts बनविणाऱ्या कंपन्या, Dimonds, & jwellery एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपन्यांना घसरणीचा फायदा होतो.
- परदेशी गुंतवणूकदारांना देशातून पैसा काढून घेणे महागणार
तोटे
- आयात महागणार
तेल आणि वायू, तसेच कोळसा आयात करणाऱ्या कंपन्यांना या घसरणीचा फटका बसणार आहे . तसेच इंधनाचे दर वाढल्याने वस्तू आणि सेवा महाग होतील.
- परदेशात शिक्षणासाठी जाणे महागणार
भारतातून सुमारे दोन लाखांहून अधिक विध्यार्थी उच्च शिक्षण साठी अमेरिकेत जातात . तसेच अमेरिके व्यतिरिक्त इतर देशांत जाणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. रुपयांचे मूल्य कमी झाल्याने राहण्याचा खर्च वाढणार आहे. आशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी डॉलर ची विशिष्ट किंमत गृहीत धरून खर्चाची योजना केलेली असते. मात्र प्रत्यक्ष अमेरिकेत जाण्याच्या वेळी डॉलर चे मूल्य बदलले असल्याने परिणामी त्यांच्यावर बोजा वाढतो . तसेच ज्या देशांचे चलन भारतीय चलनाच्या तुलनेत वधारले आहे अशा देशांमध्ये जाणे महागणार आहे. उदाहरणार्थ पर्यटनासाठी अमेरिका, ब्रिटन, युरोप, हॉंगकॉंग, सिंगापूर, ला जाणे महागणार आहे, मात्र दुसरीकडे श्रीलंका, रशिया, ला जाणे स्वस्त होणार आहे. कारण डॉलर च्या तुलनेत या देशाचे चलनाचे मूल्य कमी झाले आहे. अर्थातच भारतीय रुपयाच्या तुलनेत त्यांचे मूल्य देखील कमी झाले आहे.
महागाई चा सर्वसामान्यांना फटका काय?
भारत एकूण कच्या तेलाच्या गरजेच्या 85 % पेक्षा अधिक कच्चे तेल आयात करतो . डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने तेल खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
खाद्यतेल ही भारत मोठ्या प्रमाणावर आयात करतो त्यामुळे त्याचेही भाव गगनाला भिडलेले आहेत. एकूणच डॉलरच्या तुलनेत रुपयाची अजून घसरण होत राहिल्यास transportation खर्च वाढून एकूण महागाईत पुन्हा वाढ होऊन अन्नधान्य, भाज्या, फळे आदींच्या भावात देखील वाढ होईल.
रुपयाची घसरण रोखण्यासाठी काय करता येईल ?
देशाच्या import बिलावर नजर टाकल्यास भारत वर्षभरात खनिज तेल, सोने, आणि electronics वस्तूंवर मोठा खर्च करतो . पेट्रोल, डिझेल, च्या वाहनांच्या ऐवजी विजेवर चालणारी वाहने वापरल्यास देशावरचा आर्थिक बोजा कमी होऊ शकतो.
तसेच थेट सोने खरेदीपेक्षा Gold Bond, किंवा Gold ETF खरेदी केल्यास सोन्याच्या आयतीत घट होऊ शकते. याचबरोबर देशात आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंची निर्मिती देशातच करून ( vocal for local ) आयात बिल कमी करू शकतो.
वरील सर्व गोष्टींचा आढावा घेताना असे म्हणणे वावगे ठरणार नाही की ...
जगात फक्त अमेरिका नको एकापेक्षा अधिक सत्ताकेंद्र हवीत.
जगातील व्यापारात फक्त डॉलर नको तर एकापेक्षा अधिक चलने हवीत.
जगातील कोट्यवधी गरीब व अविकसित देशात राहणाऱ्या कोट्यवधी सामान्य लोकांच्या ते दीर्घकालीन हिताचे ठरेल.
जगातील व्यापाराच्या जवळपास 70 टक्के व्यापार अमेरिकेच्या डॉलर मध्ये चालतो.
आपला राजकीय अजेंडा राबवण्यासाठी अमेरिकेने त्याचा हत्यार म्हणून वापर केला / अजूनही करतो .
त्याला पर्याय म्हणून आपसात व्यापार करताना एकमेकांची चलने स्वीकारने / बार्टर पद्धतीचा अंशतः वापर करणे होऊ लागले आहे आणि 21 व्या शतकात ते होणे अति गरजेचे आहे.
- संदीप थोरात ( 23 जून 2022 )
Comments
Post a Comment