Posts

Showing posts from July, 2022

बेरोजगारीचे भीषण व वास्तव स्वरूप

Image
 भारताने 2018 पासून लोकसंख्याशास्त्रीय सुवर्ण काळात प्रवेश केला आहे. पहिल्यांदा च भारतातील 15 ते 64 या वयोगटातील लोकसंख्या त्या वयोगटा बाहेरील लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे कमवू शकणाऱ्या नागरिकांची संख्या ही त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिक आहे . हा काळ 2055 पर्यंत एकूण 37 वर्षे राहण्याची शक्यता आहे . 2022 मध्ये भारताचे सरासरी वय अंदाजे 28 वर्षे आहे जे चीन व अमेरिकेमध्ये 37 आहे . ही एक मोठी संधी समजली जाते ज्याचा फायदा चीन , दक्षिण कोरिया ,जपान व थायलंड यांच्यासारख्या आशियायी देशांनी चांगल्या प्रकारे उचललेला दिसून येतो . उपलब्ध मनुष्यबळाला साजेसे  उद्योग धंदे , कारखाने यांची निर्मिती त्या देशांनी केली . भारतात काय परिस्थिती आहे ?  जून 2022 च्या आकडेवारी नुसार मे 2022 मध्ये उपलब्ध असणाऱ्या 40.04 कोटी नोकऱ्या 1 कोटी ने कमी होऊन 39 कोटी झाल्या . बेरोजगारी चा दर वाढून  7.8 % झाला . शहरी भागातील बेरोजगारी  7.3 % तर ग्रामीण भागातील 8.03 % आहे.  मे 2016 मध्ये भारताची कार्यक्षम लोकसंख्या अंदाजे 95 कोटी होती . ज्यात पाच वर्षात अंदाजे 11 कोट...

भारतीय अर्थव्यवस्था आणि अतिदक्षता विभागातील रुपयांचा अन्वयार्थ

Image
 गेल्या काही दशकांच्या जागतिकीकरणात आंतरराष्ट्रीय अर्थ कारणात , विशेषतः अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत काय घडते याचे थेट परिणाम भारतातील आणि अनेक गरीब कोट्यवधी नागरिकांच्या राहणीमानवर पडू लागले आहेत.  अनेक प्रकारे याचा संबंध उलगडून दाखवता येईल , त्यातील एक म्हणजे डॉलरचा रुपयातील विनिमय दर, जो सातत्याने घसरत आहे, आणि नजीकच्या काळात अजून घसरेल असा अंदाज आहे.  त्याचे गंभीर परिणाम भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांवर होऊ घातले आहेत.  कारणे काय आहेत?  जगातील अनेक देशांत गुंतवून ठेवलेले डॉलर्सची निर्गुंतवणूक केली जात आहे आणि ती अमेरिकेत गुंतवली जात आहे, त्यामुळे देशांची चलने डॉलरच्या तुलनेत घसरत आहेत,  दोन कारणांमुळे.. 1) जागतिक पातळीवर राजकीय / आर्थिक अनिश्चितता वाढली की अनेक गुंतवणूकदार अमेरिकेत गुंतवणूक अधिक सुरक्षित मानतात. 2)  अमेरिकेतील व्याजदर वाढले की अमेरिकेतील रोख्यांमधील गुंतवणुकीवर परतावा जगातील इतर देशातील गुंतवणुकीच्या तुलनेत वाढतो, त्यामुळे देखील डॉलर्स परत अमेरिकेत नेले जातात.  हे जे काही होत आहे ते आसमंतातील वादळ नाहीये, अमेरिकेच्या केंद्री...