जल्लोष हवा लोकशाही मूल्यांचा !
लिझ ट्रस निमित्ताने... जगातील सर्वात जुन्या लोकशाही असणाऱ्या ब्रिटनच्या लोकशाहीवर लोक हसताना पहायला मिळत आहेत. जगातील सर्वात जुना राजकीय पक्ष अशी ओळख असणाऱ्या 188 वर्षाच्या conservative पार्टी वर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे . निवडणुकीत अच्छे दिन चे आश्वासन देणाऱ्या लिझ ट्रस सत्तेवर आल्यानंतर आश्वासन पूर्ण करू शकल्या नाही. त्यांनी ब्रिटनच्या टॅक्स प्रणालीत बदल करू असे आश्वासन दिले होते. ब्रिटिश जनतेला करांमध्ये मोठी कपात करण्याचे आश्वासन दिले होते , परंतु त्यांनी आणलेली नवी कर प्रणाली वादात सापडली होती. आणि त्या त्यांचं आश्वासन पूर्ण करू शकल्या नाही . त्यामुळे त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी त्यांना ओके मे थँक्यू केलं व त्यांची पंतप्रधान पदाची कारकीर्द अवघ्या 45 दिवसांत संपुष्टात आली. सर्वात जुना पक्ष असलेल्या conservative पक्षाच्या खासदारांनी लिझ ट्रस यांची निवड करताना चूक केली होती अस आपण म्हणू शकतो . लिझ ट्रस यांनी दिलेल्या आर्थिक आश्वासनांना conservative पार्टीचे पावणे दोन लाख सदस्य आणि खासदार बळी पडले .मात्र , याच खासदारांनी त्यांची चूक दुरुस्त देखील केली . त्यांनी लिझ ट्र...