केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24
केंद्र सरकार 2023 -24 या आर्थिक वर्षात 45 लाख कोटी रुपये खर्च करू इच्छिते . खर्च करण्याचे प्रस्ताव आले की लगेचच तेवढे पैसे कोठून आणणार हा प्रश्न त्याचं नाण्याची दुसरी बाजू असते . येत्या वर्षात या 45 लाख कोटी खर्च उभारणी पैकी फक्त 23 लाख कोटी रुपये कररूपाने उभे केले जाणार आहेत , बाकीचे अजून छोटे / मोठे स्रोत ,उदाहरणार्थ लाभांश ,सार्वजनिक उपक्रम विक्री इत्यादी . त्याशिवाय 15 लाख कोटी रुपये कर्ज रोख्यांतून उभारले जाणार आहेत . कर्ज उभारणीचे आकडे दरवर्षी वाढत आहेत , हे अजून वाढणार आहेत कारण वाढीव खर्चाच्या प्रमाणात प्रत्यक्ष कर वाढवले जात नाहीत . दरवर्षी काढलेले कर्ज केंद्र सरकारच्या डोक्यावर आधीच असणाऱ्या कर्जात भर घालत असते. या संचित कर्जावर दरवर्षी अर्थसंकल्पीय खर्चातून व्याज द्यावे लागते . आणि दरवर्षी अर्थसंकल्पीय खर्चात वाढणारा व्याजाचा वाटा हा सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे . कारण व्याज देण्यात पैसे गेले तर सरकारकडे कल्याणकारी कामांसाठी कमी पैसे शिल्लक राहणार हे उघड आहे . उदाहरणार्थ , यावर्षी 45 लाख कोटी पैकी 11 लाख कोटी रुपये (25%) फक्त व्याजावर खर्च होणार आहेत . म्हणजे लक...