शेअर बाजारात अदानी समुहाचे शेअर्स कोसळले
June 14,2021 उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स आज गडगडले आणि त्याचा फटका शेअर बाजाराच्या निर्देशांकाला बसला .हर्षद मेहता scam चा पर्दाफाश करणाऱ्या सुचेता दलाल या जेष्ठ पत्रकारांनी शनिवारी रात्री एक ट्विट करून खळबळ माजवली.त्या ट्विट चा परिणाम असा झाला की आज बाजार उघडताच अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग गडगडले. सुचेता दलाल यांनी 1992 मध्ये हर्षद मेहता scam प्रकरणाचा पर्दाफाश केला होता, त्यांच्या च पुस्तकावर आधारित "scam 1992' ही वेबसिरिस पण खूप प्रसिद्ध झाली. सुचेता दलाल यांनी नेमकं काय ट्विट केलं? त्यांनी आपल्या ट्विट मध्ये आणखी एक scandl होत आहे जे सेबीच्या अत्यंत कडेकोट बंदोबस्तातल्या ट्रॅकिंग सिस्टमच्या बाहेर सिद्ध करण कठीण होईल .भूतकाळातल्या एका ऑपरेटरने आता एका समूहाच्या शेअर्स चे भाव अनैसर्गिक रित्या वाढवायला सुरूवात केली आहे. हे सगळं सुरू आहे ते विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांमार्फत। काहीही बदललं नाही. अस ट्विट केलं. आता ज्या पत्रकाराने हर्षद मेहता scam उघड केलं होतं ,त्या पत्रकाराने हे ट्विट केल्यानंतर खळबळ माजनारच होती. शनिवारी रात्री हे ट्विट केलं, काल म...