वाढती महागाई ; वाढते व्याजदर आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम.



 कोणत्याही देशाच्या stock market ला perform करण्यासाठी गरजेच असत ते त्या देशातील कंपन्या कशा perform करत आहे ते , आणि सध्या भारतीय कंपन्यांचे Quarterly results येत आहेत त्यात बऱ्याच कंपन्या out perform करताना दिसत आहे .जसे SBI bank ने highest quarterly profit बुक केला जो की 9994 करोड, आत्तापर्यंत चा सगळ्यात मोठा तिमाही नफा . Reliance industries ने $100 B  Revenue benchmark touch केला 

आणि हे सर्व Corona सारख्या भयंकर आजारातून सावरत असताना, आणि त्यासोबत च महागाई (Inflation) ला तोंड देताना ह्या कंपन्या चांगल्या perform करत आहेत. 

भारतीय कंपण्याची हालत सध्या तरी ठीक वाटत आहे कारण globle ( वैश्विक) विचार केला तर , बांग्लादेश, श्रीलंका, यांची खूप बिकट परिस्थिती आहे एवढेच काय तर USA सारख्या बड्या अर्थव्यवस्था 40 वर्षातील सर्वोच्च महागाईशी लढत आहेत.  ( अमेरिकेणे  corona मुळे आलेली आर्थिक मंदि रोखण्यासाठी नोटा currency छापण्याचे जे काम केले त्याचे दुष्परिणाम आर्थिक महागाई च्या रूपाने भोगावे लागत आहे ) IT industries ची जास्त हालत खराब आहे. हे सर्व तर ठीक आहे पण तरीही भारतीय शेअर बाजार रोज एवढे का कोसळत आहे? गुंतवणूक दारांचे लाखो कोटी रुपये बुडत आहेत, यामागील कारणे काय आहेत हे आपण समजण्याचा प्रयत्न करू.

यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वाढती महागाई आणि वाढते व्याजदर.

ग्राहक महागाई निर्देशांक (CPI) अनेकानेक वास्तुमाल / सेवांच्या बास्केट वरून ठरवला जातो , ज्यात अन्नधान्य, रोजच्या वापरातील वस्तू, इंधन, शिक्षण, वाहतूक असे काही शेकडो आयटेम्स असतात . त्यात काही अत्यावश्यक  ( अन्नधान्य , पेट्रोल, वीज ) असतात , काही सुधारलेल्या राहणीमानाशी ( करमणूक ) संबंधित असतात . 

आणि आत्ताच्या महागाईचे वैशिष्ट्य हे आहे की अन्नधान्य / खाद्यतेल / इंधन यांच्या किंमती 7% पेक्षा खूप वाढल्या आहेत आणि त्याला प्रतिसाद म्हणून केंद्रीय बँका/ रिझर्व बँक व्याजदरात वाढ करत आहे. 

याचा शेअर बाजारावर काय परिणाम होतो? 

महागाई च्या परिस्थितीत देशाच्या कर्जात loans मध्ये वाढ होते आणि त्याप्रमाणात cash flow ( Liquidity )  कमी होत जाते. 
Liquidity कमी होण्याची प्रमुख कारण म्हणजे मध्यवर्ती बँकांनी केलेल्या व्याजदरवाढीमुळे Fix deposit वर जास्त परतावा मिळतो आणि तो एकदम safe असतो compare to stock market . आणि त्यामुळे आपल्या देशात बाहेरून आलेल्या foreign investment ( FII ) कडून काढून घेतल्या जातात आणि त्यांच्या देशात fix deposit मध्ये लावल्या जातात त्याचा परिणाम आपल्या stock मार्केट मध्ये heavy selloff झाल्याने Demand पेक्षा supply जास्त वाढल्याने मार्केट कोसळते आणि गुंतवणूकदारांना याचा फटका बसतो. 

त्यासोबत च देशाचा foreign cash reserve कमी होऊन देशाची buying power कमी होते आणि त्यामुळे ज्या वस्तू देशाला import कराव्या लागतात त्या वस्तूंचे देशांतर्गत भाववाढ होऊन economy collapse होण्यास हातभार लागतो. अलीकडेच आपण श्रीलंकेचे उदाहरण बघितले आहे. 

महागाई कमी करण्यासाठी व्याजदर का वाढवले जातात?

महागाई आणि व्याजदर यांचे विरुद्ध Inverse  Relationship आहे . म्हणजेच जेव्हा व्याजदर कमी असतात तेव्हा महागाई वाढते आणि जेव्हा व्याजदर वाढवले जातात तेव्हा Inflation महागाई कमी होत जाते असे एकंदरीत अर्थगणित आहे.
म्हणजे च cost of borrowing वाढवली की ग्राहक व व्यावसायिक कमी पैसा खर्च करतात आणि त्यामुळे demand कमी होऊन महागाई कमी होण्यास मदत होते , त्याउलट व्याजदर कमी केल्यास कर्जे स्वस्त होऊन ग्राहक जास्त प्रमाणात खर्च करतो आणि demand वाढल्याने supply कमी होऊन Inflation वाढते. 

त्यामुळे च मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवते ( याचा परिणाम long term मध्ये आर्थिक मंदि येण्यास ही होतो , परंतु मध्यवर्ती बँक त्यात वेळोवेळी कमीजास्त करत राहतात)

सध्या आपली बाजारावर काय strategy असायला हवी?

मागील लेखात आपण बघितले होते की मार्केट मध्ये सातत्याने घसरण होत असून ती थांबण्याचे सध्यातरी चित्र दिसत नाहीये. 
आज मार्केट ने 52 week low गाठला आणि nifty 15360 वर बंद झाला आहे. Nifty ने 15650 चा major support तोडून अधिकृत bear market मध्ये entry केली असून Bearish trend दाखवत आहे.
 ह्या volatility चा फायदा घेऊन market short करून traders ला तर चांगला फायदा होत आहे, परंतु  Investers मात्र गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत. त्यांचे portfolio Redzon मध्ये आहेत, आणि heavy losses घेऊन share विकून बाहेर पडणे ही परवडणारे नाही.
परंतु over valued stocks मध्ये invested राहणे ही तितकेच घातक ठरणार आहे हे ही लक्षात घ्यावे लागेल.

 शेवटी भारताच्या growth वर विश्वास ठेवून invested राहणं सूज्ञपणाच ठरेल यात शंका नाही.

अर्थव्यवस्थेतील अनेक व्याधी फक्त व्याजदर आणि पैशाचा पुरवठा करून दूर करता येतील हा अर्थविचार आहे ज्याच्या केंद्रस्थानी कॉर्पोरेट भांडवलाचे हितसंबध आहेत. याचे सामाजिक, राजकीय परिणाम होतात .
पण आमचे त्याच्याशी काही देणे घेणे नाही. 


                              - संदीप थोरात (17 जून 2022 )

Comments

Popular posts from this blog

Four companies lists on the exchanges today

LIC shareholders lose Rs 1.33 lakh crore in 17 sessions, what's next ?