शेअर बाजाराचा रक्तरंजित खेळ
काल सेन्सेक्स 1450 अंकांनी कोसळून 52850 वर बंद झाला .सात लाख कोटी चे बाजारमूल्य हवेत उडून गेले
.
परकीय संस्थाच नाही तर अनेक गुंतवणूकदार equity मधील आपल्या गुंतवणुकी काढून घेत आहेत; त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक(index) कोसळत आहे, अजून कोसळतील हे एवढ्यात थांबणार नाही कारण महागाई दर काही दशकांच्या उच्चांकी स्थरावर आहे.
लाखो कोटीं रुपयांचा खेळ आहे हा ; काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील
1) मार्केट index (sensex & Nifty) ज्यावेळी वर जातो आणि खाली येतो नंतर पुन्हा वर जातो हे काही गुरुत्वाकर्षण सारख्या नैसर्गिक शक्तीने नाही, ते मानवीय एजन्सीज अतिशय सहजपणे करतात, म्हणजे शेअर्स ची खरेदी - विक्री कोणत्या शेअर्सची , किती शेअर्सची , केव्हा हे (कोणीतरी) Big player ठरवतात .
2) Index ( sensex & Nifty) वर गेल्यावर सर्व शेअर्स वर जातात , सर्वांचा नफा होतो , Index खाली आल्यावर सर्व शेअर्स खाली येतात आणि सर्वांचे नुकसान होते असे कधीच नसते.
3) शंभर टक्के retail गुंतवणूकदार फक्त cash segment मध्ये व्यवहार करतात ; तर संस्थात्मक गुंतवणूकदार आणि High Networth Indivisual एकाचवेळी cash आणि Derivative मध्ये खेळतात, त्यामुळे त्यांचा नफा / तोटा एकत्रित पणे बघतात . आणि तीच scientific पद्धत आहे.
62000 सेन्सेक्स असताना जी लोक सल्ला देत होती की शेअर्स अजून वर जातील घ्या; ती त्यावेळी स्वतःचे शेअर्स विकत असतील. सेन्सेक्स 56000 आला मग रिटेल गुंतवणूकदारांना भीती वाटली की अजून खाली जाईल , म्हणून त्यांनी आहे ते शेअर्स तोटा पत्करून विकले असतील , तर याच लोकांनी Retail investers चे शेअर्स विकत घेत सेन्सेक्स 61000 वर नेला; मग परत विकले, मग परत खरेदी केले.
प्रत्येक चांगली बातमी पेरली जाते, बातमीला साखर लावली जाते; प्रत्येक वाईट बातमीला तिखट ,कडू लावले जाते; घबराट पसरवली जाते.
खाली दिलेल्या ग्राफ मध्ये गेल्या वर्षभरातील सेन्सेक्स कसा चढला, कोसळला याचे चित्र..
ऑगस्ट 2021 : 52000 पासून चढत
ऑक्टोबर 2021 : 62000 पासून खाली येत
परत डिसेंबर 2021 : 56000 पासून चढत
जानेवारी 2022 : 61000 पासून खाली येत
मार्च 2022 : 53000 पासून चढत
एप्रिल 2022 : 60000 प्लस
जून। 2022 : 52700
हा काय लहान मुलांच्या अम्युजमेंट पार्कमधील रोलर कोस्टर चा खेळ नाही ,
रक्तरंजित खेळ आहे हा ।
खोल खिसा असेल , जोखीम घेण्याची पैशाची ऐपत असेल (money management) तरच मार्केट मध्ये उतरा..

Comments
Post a Comment