शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी 1ऑक्टोबर पासून डिमॅट खात्याच्या नियमांमध्ये होणार बदल
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे , 1 ऑक्टोबर पासून सर्व नवीन डिमॅट खात्यांसाठी Nomination form भरणे गरजेचे असणार आहे . जे लोक nomination फॉर्म भरू इच्छित नाही ,त्यांना यासंबंधी वेगळा फॉर्म भरावा लागणार आहे. सध्याच्या डिमॅट खातेधारकांना 31 मार्च 2022 पर्यंत नॉमीनेशन फॉर्म भरणे गरजेचे असणार आहे. नॉमीनेशन किंवा Declaration फॉर्म न भरल्यास डिमॅट खात्यातून होणाऱ्या शेअरच्या खरेदी विक्रीवर निर्बंध येऊ शकतात. NSDL आणि CDSL यांच्या रिपोर्ट नुसार financial year 2020-21 मध्ये 14.2 कोटी नवीन खाती उघडण्यात आली आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही संख्या तिप्पट आहे. शेअर बाजारात Retail गुंतवणूक दारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नॉमीनेशन संदर्भातील बाबी बारकाईने माहिती असायला हव्या. Nomination केव्हा करावे? नॉमीनेशन ची प्रक्रिया खूपच सोपी आहे, तुमचा ब्रोकर अकाउंट ओपन करते वेळेस नॉमीनेशन साठी एक स्टेप उपलब्ध करून देईल ज्यामध्ये खातेधारकाने आपल्या मनाप्रमाणे नॉमिनी निश्चित करणे गरजेचे असेल. डिमॅट खातेधारकाच्या निधनानंतर त्यांनी गुंतवणूक केलेले शेअर कोणाला दे...