जल्लोष हवा लोकशाही मूल्यांचा !


 लिझ ट्रस निमित्ताने...

जगातील सर्वात जुन्या लोकशाही असणाऱ्या ब्रिटनच्या लोकशाहीवर लोक हसताना पहायला मिळत आहेत. जगातील सर्वात जुना राजकीय पक्ष अशी ओळख असणाऱ्या 188 वर्षाच्या conservative पार्टी वर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे . निवडणुकीत अच्छे दिन चे आश्वासन देणाऱ्या लिझ ट्रस सत्तेवर आल्यानंतर आश्वासन पूर्ण करू शकल्या नाही. त्यांनी ब्रिटनच्या टॅक्स प्रणालीत बदल करू असे आश्वासन दिले होते. ब्रिटिश जनतेला करांमध्ये मोठी कपात करण्याचे आश्वासन दिले होते , परंतु त्यांनी आणलेली नवी कर प्रणाली वादात सापडली होती. आणि त्या त्यांचं आश्वासन पूर्ण करू शकल्या नाही . त्यामुळे त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी त्यांना ओके मे थँक्यू केलं व त्यांची पंतप्रधान पदाची कारकीर्द अवघ्या 45 दिवसांत संपुष्टात आली.

सर्वात जुना पक्ष असलेल्या conservative पक्षाच्या खासदारांनी लिझ ट्रस यांची निवड करताना चूक केली होती अस आपण म्हणू शकतो . लिझ ट्रस यांनी दिलेल्या आर्थिक आश्वासनांना conservative पार्टीचे पावणे दोन लाख सदस्य आणि खासदार बळी पडले .मात्र , याच खासदारांनी त्यांची चूक दुरुस्त देखील केली . त्यांनी लिझ ट्रस यांना ओके मे थँक्यू केलं आहे  .

यानिमित्ताने एक बाब प्रकर्षाने समोर आली , ती म्हणजे भारतात अशा प्रकारे आश्वासने देणाऱ्या नेत्यांना ओके मे थँक्यू का म्हणत  नसतील ?

सरकार कोणत्याही पक्षाचे असो , स्वतःच्या पक्षाच्या नेत्याने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही म्हणून खासदार / आमदार राजीनामा द्यायला का भाग पाडत नसतील ?
आपल्या देशात लोकशाही आहे , आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत असेही म्हणत असू , मात्र आपल्या देशात पक्षांतर्गत लोकशाही नाही , हे दुर्दैवाने म्हणावं लागेल . 
पक्षाच्या चुकलेल्या ध्येय , धोरणा विरोधात बोलण म्हणजे पक्ष विरोधी कृती नसते , ती पक्षांतर्गत लोकशाही असते .

आपल्याकडे पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत पक्षाध्यक्ष पेक्षा वेगळी भूमिका घेतली तर त्याची पक्षातून हकालपट्टी केली जाते.
पक्षाध्यक्ष च सोडा पक्षाध्यक्षाच्य कुटुंबाविरोधात जरी बोलले तरी कार्यकर्त्यांना पक्षातून नारळ दिला जातो. आणि त्याच पक्षातील नेते देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे गळे काढतात . खरच आपल्याला ही लोकशाही मान्य आहे का ?

जगातील सर्वात जुन्या लोकशाही असलेल्या देशाला नाव ठेवताना जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील नागरिकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे .

लिझ ट्रस यांच्या अगोदर चे पंतप्रधान बोरिस जॉन्सन मागील तीन वर्ष सत्तेत होते . डिसेंबर 2019 मध्ये मिळवलेल्या विजयानंतर त्यांनी पंतप्रधान पदासाठी आपला दावा मजबूत केला होता . मात्र त्यांचा कार्यकाळ घोटाळे आणि टीकेने भरलेला होता . मात्र दोन घोटाळे असे होते की ज्यामुळे त्यांना राजीनामा ( Resign ) द्यावा लागला होता .

कोरोणा काळात सरकार ने कठोर निर्बंध लादलेले असताना पंतप्रधान जॉन्सन अनेक वादग्रस्त दारू पार्ट्यामध्ये सापडले होते , त्याची त्यांनी जाहीर  माफीही  मागितली होती. परंतु त्यांच्याच conservative पार्टीच्या खासदारांनी माफी नाकारली होती. त्यातच त्यांना अविश्वास ठराव ला ( no confidence motion ) सामोरे जावे लागले होते . 
परंतु  359 पैकी 211 / 148 असा त्यांनी अविश्वास ठराव जिंकला होता. 
तेव्हाचे अर्थमंत्री ऋषी सुणक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी बोरिस जॉन्सन यांच्या निषेधार्थ राजीनामे दिले होते .त्याच्या दुसऱ्या च दिवशी 40 मंत्री व अधिकारी यांनी राजीनामे दिले होते.


सुनक पर्व ...

ऋषी सुनक ब्रिटन चे पंतप्रधान झाले म्हणून हिंदुस्तानात आनंदाचे भरते आले आहे .
कारण हिंदू पंतप्रधान झाला .
" हिंदू  धर्माची ब्रिटिश व्यक्ती " असे सूनक आहेत 
धर्म कोणताही असला तरीही सुनक यांचे प्रेम आणि अधिकार राहत असलेल्या राष्ट्रावर राहणार . भारत आणि इंग्लंड यांच्यात मॅचपासून ते राजकीय धोरणंपर्यंत मतभेद झाले तर सूनक हिंदू नसतील ते राष्ट्रहित जपतील . स्वतः सूनक यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की  " ब्रिटन " हे माझे घर आहे , माझे राष्ट्र आहे, जरी मी इथे अल्पसंख्य असलो तरीही ! निवडणुकी वेळी सूनक यांनी आश्वासन दिले आहे की ते राष्ट्राची पुनर्बांधणी करतील. अर्थव्यवस्था बळकट करतील. आणि ब्रिटिशांच्या विश्वासास पात्र ठरतील . 
माझा धर्म म्हणजे  " राष्ट्रप्रेम " , स्वच्छ कारभार आणि कष्ट ,हे आहे . भारतीय ब्रिटिश अल्पसंख्यांक ही माझी ओळख असली तरीही मी कडवा ब्रिटिश आहे .

केवळ सूनक यांनाच ब्रिटिशांनी स्थान दिले असे नाही .पाकिस्तानी मूळ असलेल्या साजिद जविद  आणि इराकी मूळचे नादिस झाहाकी हेही सूनक यांच्याइतकेच महत्वाच्या स्थानावर आहेत . Conservative पार्टीत त्यांना महत्वाचे अधिकार आहेत . इथे कौतुक ब्रिटिशांच्या धर्मनिरपेक्षतेचे आहे .

 "धर्म  " राजकारणास दुर्गंधीत करतो हे सूनकांनी सुनावले आहे . 

सूनक  भारतात का परतले नाही ?

कारण ते म्हणतात .. जिथे सर्वोत्तम अशी राहण्याची  व्यवस्था असेल जसे की उद्योजकतेसाठी पाठबळ ,कुटुंबासाठी सर्वोत्तम वातावरण , सर्वोच्च शिक्षण देणारी व्यवस्था , सामाजिक मूल्यांचा सन्मान , जे ब्रिटन मध्ये आहे . ते माझे निवस्थान आणि असे ब्रिटिशपण माझ्यात आहे .

सूनकांचा पुढील पंतप्रधान पदाचा प्रवास किती खडतर आणि अव्हानांनी  भरलेला आहे  हे आपणास ठाऊक आहेच आणि पुढील काळ ते दाखवून देईल .
देशांतर्गत राजकारणापासून ते संपूर्ण युरोप आणि जागतिक राजकारणात ब्रिटन चे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे काम त्यांना करावे लागेल तसेच ..
ज्या भारताने नुकतेच जगातील बलाढ्य अर्थव्यवस्थेत ब्रिटन ला पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर ढकलले आहे , त्याचं भारतीय वंशाच्या सूनक यांच्या हातात ब्रिटिशांनी देश सोपवला आहे . ब्रिटिशांनी टाकलेल्या त्यांच्यावरील विश्वासास सार्थ ठरवण्याचे आव्हान देखील सूनक यांच्यासमोर असणार आहे .

परंतु ...

बदललेल्या ब्रिटिशांचे खरे तर कौतुक  हवे , 
परदेशी व्यक्ती मग ती कोणत्याही धर्माची असो त्यांनी स्वीकारली आहे . परदेशातून येऊन राहिल्यावर देखील आपलेच मानने  यासाठी मोठे अंत:करण  लागते .

धर्माच्या , वंशाच्या नावाने जयजयकार हिटलर रुपात साऱ्या जगाने पाहिलाय .

ज्या दिवशी सूनकांच्या पार्टीत इंग्रज राष्ट्रवादी प्रबळ होतील त्यादिवशी तेथे ही ते टिकणार नाहीत .


                                          - संदीप थोरात
                              ( 25 ऑक्टोबर 2022 )





Comments

Popular posts from this blog

वाढती महागाई ; वाढते व्याजदर आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम.

Four companies lists on the exchanges today

LIC shareholders lose Rs 1.33 lakh crore in 17 sessions, what's next ?