तरुण नवउद्योजकांसाठी व्यवसाय संबंधित काही मार्गदर्शक तत्वे .

 फ्लिपकार्ट चे संस्थापक सचिन बन्सल , बिन्नी बन्सल, OYO Rooms चे रितेश अग्रवाल ,ओला कॅब चे संस्थापक भाविष अग्रवाल ,अंकित भाटी , हे अतिशय तरुण Entrepreneurs आहेत . यांचे अताचे वयही चाळीसच्या आतले आहे . बिजनेस सुरू केला तेव्हा पंचवीस - तीस - बत्तिशित होते. पण त्यांनी भलेमोठे स्वतःचे Unicorn  startups उभे केले. फार कमी वयात millionaire - Billionaire झाले.

             यांच्यासारख्या startups कडे पाहून आदर्श घेऊन, स्वप्ने घेऊन, अनेक startups आली अन् त्यातली कित्येक गेलीही, कित्येक जाण्याच्या मार्गावर आहेत , market मधे ते sustain करू शकत नाहीये. आजही रोज नवनवीन startups registered होतं आहेत आणि बंद पडत आहेत. परंतु हे जे काही startups प्रचंड यशस्वी झाले ,यांच्या प्रेरणेतून आलेले लाखो startups कधी आले कधी गेले कळत सुद्धा नाहीये. 
          यांना फार कमी वयात अमाप यश मिळाले असेच यश आपल्यालाही मिळेल ह्या विश्वासापायी उतरलेल्या अनेकांना अपयश आले . अगदी द्वितीय - तृतीय श्रेणी शहरांमधे देखील असे भारावलेले तरुण व्यवसाय सुरू करताना दिसले.

       वर उल्लेख केलेले बिजनेसेस आभाळाला खेटलेले आहेत ,त्यामुळे यांच्यासारखी स्वप्ने पहायची सवय तरुणाईला लागली . मोठ्या महत्वाकांक्षा घेऊन उतरलेले तरुण काहीच वर्षात व्यवसायात डबघाईला आलेले आहेत.
                मोठी स्वप्ने पाहण्यासाठी केवळ मेंदू , मनच लागत नाहीत . तर उत्तम कल्पना , अनुकूल वेळ ,योगायोग, संसाधने ,सरकारी नियम - धोरण , लोकेशन ,व्यवसायाचे ज्ञान , त्याचे execution , patience ( धीर ) लागतात . 

     ह्या गोष्टी जुळून आल्या तर माणसाच्या यशस्वी होण्याच्या शक्यता वाढतात .

वर उल्लेख केलेल्या काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात , काही गोष्टी बाह्याघटकांवर अवलंबून असतात. साऱ्या गोष्टी जुळून येतील च असे नाही . त्यात patience बाबत बोलायचे म्हटल्यास सारा मनाचा आणि खिशाचा खेळ आहे .
                बाहेरून खंबीर , कणखर , confident वाटणारी माणसं कधी कोणत्या प्रसंगाला हतबल होतील , सांगू शकत नाही . त्यांचे अवसान कधी गळून पडेल याचा अंदाज नाही .

स्वप्न बघताना सारासार विचार व्हावा. सारेच शाहरुख बनू शकत नाही. शाहरुख बनण्याच्या नादात लाखो तरुण मुंबई त येऊन संपून जातात , निकामी होतात , म्हणून साऱ्या बाजूंनी विचार करायला हवा.

मोठी स्वप्न बघताना कुठे थांबायचे , आपली क्षमता किती आहे, कुठे पोहचल्यावर समाधानी राहत मार्गक्रमण करायचे, हेही कळायला हवे . हे कळले की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात . आपल्या ताकदीचा जराही विचार न करता मोठी स्वप्ने बघणे म्हणजे वास्तवाचे आकलन न करता स्वतःलाच गैरसमजात ठेवण्यासारखे आहे . माणूस स्वतःच्या क्षमतांच्या मर्यादांचा अभ्यास करत नाही ,कारण त्याच्यात आपण कशात कमी आहोत हे स्वीकारायचे धाडसच नसते .त्यामुळे वास्तवाकडे मात्र डोळेझाक होते .

क्षमता नसताना मोठी स्वप्न  बघितल्यानं आणि त्याचा अवलंब करण्यासाठी जीवतोड मेहनत केल्याने माणूस अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांना निमंत्रण मात्र देतो .

व्यवसाय सुरू करताना तरुण उद्योजकांनी काय करणे अपेक्षित आहे ?

1) वर उल्लेख केल्याप्रमाणे कोणताही व्यवसाय सुरू करताना आपण अगोदर आपली क्षमता बघणे फार गरजेचे  आहे . आपण काय करू शकतो हे महत्वाचे आहे . येथे confidance ची आवश्यकता आहे . Overconfidance घातक ठरू शकतो . कारण आपली क्षमता असेल तिथपर्यंत च स्वतात confidance असतो.

2) बिझनेस सुरू करण्यासाठी सर्वात अगोदर गरजेचे असते ती एक उत्तम कल्पना . आपण कोणत्या प्रकार चा business करू शकतो ? त्याचे संपूर्ण ज्ञान आणि strategic प्लॅन तयार असायला हवा . त्यात business सुरू करण्यापासून  तर शेवट पर्यंत आपल्या समोर कोणत्या अडचणी येऊ शकतात, त्यावर आपल्याकडे काय solution असेल ? Business चे future काय आहे ? भविष्यात त्यात growth opportunity आहेत का? त्या segment मधे सरकारी धोरणे काय आहेत ? ते कशा प्रकारे आपल्या व्यवसायावर परिणाम करू शकतात ? आणि शेवट जर अपयश आलेच तर त्यासाठी आपल्याकडे प्लॅन B असणे अत्यंत महत्वाचे आहे. अन्यथा कॅफे कॉफी डे चे मालक V . Sidharth सारखी परिस्थिती उद्भवू शकते .

3) बिजनेस साठी पुरेसे संसाधने उपलब्ध असणे किंवा उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य लोकेशन आवश्यक असते ,जेणेकरून transportation cost कमी होऊन profit margins वाढू शकतात ,आणि बाजारपेठ ही मिळू शकते . 

4) भांडवल (capital ) 
आपण जो काही बिजणेस चालू करत असाल त्यासाठी capital requirment किती आहे हे अभ्यासणे महत्वाचे आहे .
समजा आपल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 लाखांची आवश्यकता असेल तर आपल्याकडे किमान 1 करोड surplus ammount असणे गरजेचे आहे . Bcoz व्यवसाय चालू केला म्हणजे लगेच प्रॉफिट चालू होईल असे अजिबात नसते . सुरुवातीला investment करावी लागते . हळूहळू त्यात growth होत जाते.
आजही अशा अनेक कंपन्या आहेत ज्या 10-15 वर्षांपासून प्रॉफिट कमविण्यासाठी धडपड करत आहेत परंतु त्यांना ते शक्य होत नाहीये . ( त्यासाठी expenses less करणे आणि मार्केटिंग वर कमी खर्च करणे पर्याय असू शकेल ) 

5) हे सर्व करताना नंबर येतो business plan execution चां . जेव्हा आपण वरील सर्व बाबींचा अभ्यास करून strategic प्लॅन तयार करतो तेव्हा त्याचं योग्य वेळी exicute करणे फार महत्त्वाचे असते . फक्त प्लॅन करून चालत नाही त्याचे योग्य वेळी योग्य पद्धतीने execution करणे गरजेचे असते . त्यासाठी तज्ञांची मदत घेणे ही योग्य ठरते. 
आणि जेव्हा आपण कोणताही business संपूर्ण गोष्टींचा अभ्यास करून चालू करतो तेव्हा तो यशस्वी होण्याचे चांसेस अनेक पटीने वाढतात.

झटक्यात - काही वर्षात काहीही होत नसते , प्रगती होत नसते . त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि धीर धरावा लागतो . गुजराती - मारवाडी - सिंधी लोकांना मोठे व्हायला अनेक पिढ्या खर्ची घालव्या लागल्या , तेव्हा कुठे ते आता व्यवसायात स्थिर , समृध्द, संसाधणानी  मालामाल आहेत 

तरी..

Room for error ठेवणे फार महत्वाचे आहे. आपल्याला कधीही अपयशाचा टॅग लागू शकतो , हे अगोदर च स्वीकारले की अपयश आले तरी मनाला फार लागत नाही. आणि सावरायला , निस्तरायला , नवे काही उभारायला सोपे जाते . डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्यापेक्षा हे कधीही श्रेयस्कर    


                 -  संदीप थोरात ( 2 ऑक्टोबर 2022)


        

Comments

Popular posts from this blog

वाढती महागाई ; वाढते व्याजदर आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम.

Four companies lists on the exchanges today

LIC shareholders lose Rs 1.33 lakh crore in 17 sessions, what's next ?