Upcoming IPO , गुंतवणूकदारांसाठी मोठ्या कमाईची संधी। 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान 4 मोठे IPO ओपन होणार .
पुढच्या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी कमाईची चांगली संधी असणार आहे. 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान 4 मोठे IPO( initial public offering) खुले होणार आहे . त्यामुळे पूर्ण आठवड्यात बाजारात मोठा पैसा कमावण्याची संधी असणार आहे .
CarTrade Tech ,Chemplast Sanmar , Nuvoco vistas आणि Aptus value Housing finance india ह्या चार कंपन्यांचे आयपीओ बाजारात येत आहेत.
CarTrade Tech IPO
Online Auto Classified platform कारट्रेड टेक चा IPO 9 ऑगस्टला खुला होणार आहे . या आयपीओ मध्ये 11 ऑगस्ट पर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. या इश्युच्या माध्यमातून 2999 कोटी रुपये उभारण्याचे कंपनी चे लक्ष आहे. कंपनी ने आयपीओ ची प्राइज बँड 1585 ते 1618 रुपये ठेवली आहे. हा आयपीओ पूर्णतः ऑफर फॉर सेल असणार आहे. CarTradeTech ग्राहकांना नवीन आणि जुन्या दोन्ही प्रकारच्या कार खरेदी करण्याची सुविधा देते.
आयपीओ मध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के भाग राखीव असेल, तर 35 टक्के भाग गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी 15टक्के भाग राखीव असणार आहे.
Chemplast Sanmar IPO
Speciality chemical बनवणारी कंपनी केमप्लास्ट सनमार लिमिटेड चा आयपीओ 10 ते 12 ऑगस्ट पर्यंत खुला असणार आहे . आयपीओ ची बँड प्राइज 530 ते 541 रुपये इतकी आहे. आयपीओ च्या माध्यमातून 3850 कोटी रुपये उभारण्याची कंपनी ची योजना आहे.
संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 75 टक्के
गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के
रिटेल गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के
आशा प्रकारे राखीव भाग असणार आहे
Nuvoco vistas corporation ltd IPO
नूवोको विस्टाचा आयपीओ 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान खुला होणार आहे . या आयपीओ साठी प्राइज बँड 560 ते 570 रुपये निश्चित केला आहे. इशू साईज 5000 कोटींची असणार आहे.
Aptus value Housing finance india IPO
या कंपनी चा आयपीओ 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान ओपन होणार आहे. या आयपीओ ची प्राइज बँड 346 ते 353 रुपये निश्चित केलेली आहे. या आयपीओतून 2780 कोटी रुपये उभारण्याचे कंपनी चे लक्ष आहे.
या सर्व चारही कंपन्यांची लिस्टिंग NSE आणि BSE दोन्ही Exchange वर होणार आहे .

Comments
Post a Comment