Stock pik ; या 4 स्टॉक मध्ये आत्ताच गुंतवा पैसा; सणासुदीच्या दिवसांत मिळेल बंपर रिटर्न
Strong fundamental असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पुढील काही महिन्यांत मोठी कमाई होऊ शकते.
Festive सिझन ची सुरुवात होत असून येथून पुढे बरेच सण उत्सव देशात साजरे होत राहतील. पुढे रक्षाबंधन, नवरात्र, गणेशोत्सव, दसरा ,दिवाळी असे अनेक सण उत्सव आहेत . अशात देशातील उत्पादनाचा खप वाढतो. विशेषतः consumer सेक्टर, लाइफ स्टाईल सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर आणि टुरिझम सेक्टरमध्ये मोठी डिमांड वाढेल. त्यामुळे या सेक्टरशी संबंधित मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पुढील काही महिन्यात मोठी कमाई केली जाऊ शकते . मार्केट एक्स्पर्ट सिद्धार्थ सेडानी यांनी 4 असे शेअरची निवड केली आहे ते म्हणजे VIP Industries, Crompton consumer, IRCTC , आणि M&M होय. या शेअर्समध्ये पुढील 6 महिने ते 1 वर्षात चांगली प्रगती दिसू शकते.
सिध्दार्थ सेडानी यांनी म्हंटले आहे की येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये शॉपिंग वाढेल. ग्राहकांची spending वाढेल, लाईफस्टाईल प्रॉडक्ट ची डिमांड वाढेल. ट्रॅव्हल आणि टुरिझम industry चा व्यवहार वाढेल . ऑटोमोबाईल सेक्टर ला सुद्धा चांगली डिमांड येईल. दिवाळी आणि दसऱ्याच्या दरम्यान गाड्यांची विक्री वाढते , त्यामुळे फंडामेंटल मजबूत असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवता येऊ शकतो.
VIP Industries
ही टुरिझम सेक्टर मधील लिडिंग कंपनी आहे. Lockdown शिथिल होणे आणि फेस्टिव्ह season मुळे कंपनी ला चांगला फायदा होऊ शकतो. येणाऱ्या दिवसांमध्ये 2 वर्षात 50 टक्के महसूल वाढीचा अंदाज आहे. कंपनी चे जून तिमाही मधील निकाल देखील उत्तम आले होते.
Target- 570 रुपये
Return-16 टक्के
Crompton Consumer
Consumer सेक्टरमधील लिडिंग कंपनी आहे. कंपनी फॅन , लाईटिंग, आणि होम अप्लायन्सेस बनवते. यामुळे कंपनी चा मार्केट शेअर मोठा आहे .
Target-550 रुपये
Return- 21 टक्के
IRCTC
ही भारत सरकार ची मिनिरत्न कंपनी होय. लॉक डाउन खुले झाल्याने या कंपनीला फायदा होईल. रेल्वे सेवा सामान्य झाल्यानंतर कंपनीची कमाई वाढेल. ही मजबूत फंडामेंटल असलेली डेट फ्री कंपनी आहे.
Target - 2870 रुपये
Return- 7 टक्के
M&M
महिंद्रा अँड महिंद्रा ऑटोमोबाईल सेक्टरमधील लिडिंग कंपनी आहे. कंपनीचा सणासुदीच्या काळात व्यापार वाढतो कारण वाहनांची विक्री जास्त होते. सध्या कंपनी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ही गुंतवणूक करीत आहे.
Target- 940 रुपये
Return- 19 टक्के.
Comments
Post a Comment