शेअर बाजारात अदानी समुहाचे शेअर्स कोसळले

June 14,2021

उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स आज गडगडले आणि त्याचा फटका शेअर बाजाराच्या निर्देशांकाला बसला .हर्षद मेहता scam चा पर्दाफाश करणाऱ्या सुचेता दलाल या जेष्ठ पत्रकारांनी शनिवारी रात्री एक ट्विट करून खळबळ माजवली.त्या ट्विट चा परिणाम असा झाला की आज बाजार उघडताच अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग गडगडले.

सुचेता दलाल यांनी 1992 मध्ये हर्षद मेहता scam प्रकरणाचा पर्दाफाश केला होता, त्यांच्या च पुस्तकावर आधारित "scam 1992' ही वेबसिरिस पण खूप प्रसिद्ध झाली.

सुचेता दलाल यांनी नेमकं काय ट्विट केलं?

त्यांनी आपल्या ट्विट मध्ये आणखी एक scandl होत आहे जे सेबीच्या अत्यंत कडेकोट बंदोबस्तातल्या ट्रॅकिंग सिस्टमच्या बाहेर सिद्ध करण कठीण होईल .भूतकाळातल्या एका ऑपरेटरने आता एका समूहाच्या शेअर्स चे भाव अनैसर्गिक रित्या वाढवायला सुरूवात केली आहे. हे सगळं सुरू आहे ते विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांमार्फत। काहीही बदललं नाही. अस ट्विट केलं. 

आता ज्या पत्रकाराने हर्षद मेहता scam उघड केलं होतं ,त्या पत्रकाराने हे ट्विट केल्यानंतर खळबळ माजनारच होती. शनिवारी रात्री हे ट्विट केलं, काल मार्केट बंद होत पण त्यांच्या ट्विट ने शेअर दलालांच्या विश्वाला आग लावली होती .काल दिवसभर खूप चर्चा रंगल्या होत्या .

National securities Depository limited (NSDL) ने अदानी समूहात तब्बल 43 हजार 500 कोटी रुपयांचे शेअर घेतलेल्या तीन विदेशी कंपन्यांची खाती गोठवल्याची बातमी आली होती . त्यात  Albula investment fund, cresta fund , APMS investment fund ,  हे 31 मे च्या आधी गोठवण्यात आले होते.कदाचित या माहितीच्या आधारेच सुचेता दलाल यांनी ट्विट केलं असावं. ही माहिती NSDL च्या वेबसाईट वर उपलब्ध आहे त्यामुळे बाजार सुरू होताच Adani enterprises ltd चे शेअर 25% ने खाली आले शुक्रवारी या कंपनी चा बंद भाव होता 1601 रुपये . हाच शेअर गेल्या एक वर्षात 777% ने वधारला होता . इतकेच काय तर अगदी lockdown च्या काळात ही चालू वर्षभरात हा stock 179% ने वधारला होता . Adani port चा शेअर 19% ने घसरला होता. देशात lockdown ची स्थिती असताना बाजारपेठेत मागणी मंदावलेली असताना शेअर मार्केट तेजीत होत,आणि या बाबत अनेक तज्ज्ञांनी चिंता ही व्यक्त केली होती ,पण आजच मार्केट कोसळलं ते एका scam च्या भीतीने. 

सुचेता दलाल यांच्या ट्विट ला राजीवरंजन सिंग यांनी उत्तर देताना त्यात त्यांनी कोणत्या  विदेशी फंडांनी अदानी मध्ये गुंतवणूक केली याची यादी च दिलीय.अदानी समूहाने नेमकं काय केलंय किंवा या फंडांनी काय केलं याची माहिती लवकरच बाहेर येईल, तोपर्यंत मात्र गुंतवणूकदारांनी सावध रहावं असाच सल्ला दिला जातोय कारण कोणताही scam झाला तरी त्यात बळी जात असतो तो सामान्य गुंतवणूकदारांचा .


Comments

Popular posts from this blog

वाढती महागाई ; वाढते व्याजदर आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम.

Four companies lists on the exchanges today

LIC shareholders lose Rs 1.33 lakh crore in 17 sessions, what's next ?